Thursday, 12 January 2017

shri shakti


लेखन:  | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ नोव्हेंबर २०१०
स्त्री शक्तीला सलाम - मराठी लेख | Stree Shaktila Salam - Marathi Article
स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मुर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत कमी नाही. पारंपारिकरित्या पुरूषांची समजली जाणारी क्षेत्रे महिला काबीज करत आहे.
भारतीय तत्वाज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभुत सुविधा व समृध्दी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञान, कल्पना देणारी महासरस्वती असते. अशा प्रकारे या तीन शक्तींना महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान दिलेले आहे. पूजा जरी पुरूष दैवताची केली जात असली तरी चर्चा होते ती त्यांच्या शक्तीची, त्यांच्या असलेल्या स्त्री शक्तीची.
स्त्री आणि पुरूष यांच्यात केवळ शरीरभेद नाही तर स्त्री अधिक संवेदनशील, श्रध्दावंत आहे, तिला देवत्वाचे अस्तित्व अधिक जाणवते. पुरूषाचे लक्ष्य मात्र भौतिकतेकडे, जडत्वावर अधिकार गाजविण्याकडे अधिक असते.
राजा जनकाच्या राजसभेत याज्ञवलक्याला कसे प्रश्न विचारण्यात आले होते. ते तुम्हाला आठवते का? त्यांना प्रश्न विचारण्यापैकी प्रमुख होती वाचवनवी नामक एक कुमारी मोठी वाक्पटू होती. त्या काळी अशा स्त्रियांना ब्रह्मवादिनी म्हणत. एखाद्या कुशल धनुर्धराच्या हातात चमकणारे दोन बाण असावेत तसे माझे प्रश्न आहेत असे ती म्हणाली. त्या ठिकाणी तिच्या स्त्रीत्वासंबंधी कोणताही प्रश्न उपस्थित केलेला नाही.
तसं पाहता समाजातील स्वतःचे न्यायस्थान जगभरात कुठेही भारतातील महिलांना पुरूषांप्रमाणे उक्ते मिळाले नाही. गेल्या शतकात त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाच्या आणि त्यातून महिलांनी साधलेली प्रगतीचा थोडक्यात प्रवास १९५० मध्ये प्रेम माथुर यांना भारतातील पहिल्या व्यावसायीक महिला वैमानिक होण्याचा मान, १९५२ च्या ऑलिपिंक स्पर्धामध्ये पुरूष व महिलांना एकत्र खेळण्याची संधी, भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, सुचेता कृपलानी यांना भारतातील पहिल्या मुख्यमंत्री होण्याचा मान, भारतीय पोलिस सेवेत अधिकारी पदावर किरण बेदी यांची निवड पोलिस सेवेत अधिकारी पदावर दाखल झालेल्या पहिल्या महिला, मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर, भारतीय सैन्य दलात महिलांचा प्रवेश, भारताच्या राष्ट्रपती पदी महिलेची निवड प्रतिभाताई पाटिल, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भारतरत्न किताब, भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५०% आरक्षण.



Sunday, 8 January 2017

आज मीडिया में, सोशल मीडिया में हर जगह बात होती है, चिल्लाहट मचती है तो सिर्फ और सिर्फ कन्या भ्रुण हत्या की। लेकिन भ्रुण-हत्या (जीसकी जांच ही न की गई हो, लडका है या लडकी) की कोई भी बात ही नहीं करता। भ्रुण, चाहे उसने इस संसार में कदम न रखा हो; लेकिन उसमें एक जीवात्मा तो रहती ही है न! फीर क्यों हम बहुत ही निर्दयता से भ्रुण-हत्या करते है? जिसका हमें कोई अफसोस भी नही होता। यह मैं निम्न दो सत्य घटनाओं से स्पष्ट करना चाहुंगी। दोनों घटनाओं में सिर्फ पात्रों के नाम बदल दिए गए है।

घटना 1-

"क्या बताऊ, शादी को दो साल हो गए लेकिन अभी तक खुशी ने कोई खुशखबर नहीं सुनाई"  "डॉक्टर क्या बोलते है?"  "डॉक्टरों के मुताबिक दोनों नॉर्मल है, फिर भी न जाने क्यों...मेरे तो कर्म ही फुटे है, जो बांझ बहू गले पडी!!" जब सरला चाची ने ऐसा कहा तो मैंने खुशी की तरफ देखा। उसके चेहरे पर दु:ख, अपमान की पिडा, बेबसी सब कुछ एक साथ नजर आए। ऐसे में मैं भी बस "देखिए चाची जी, जब सब नॉर्मल है, तो जल्द ही आपको खुशखबरी सुनने मिलेगी।" इतना कह कर चुप हो गई। ईश्वर की कृपा से साल भर बाद ही खुशी ने एक सुंदर से बेटे को जन्म दिया। पुरा परिवार खुशी से झूम उठा।


तीन साल बाद अचानक किसी कार्यवश उनके यहां जाना हुआ तो खुशी बहुत ही थकी-थकी सी लग रही थी। पुछने पर उसने बताया, ''अभी दस दिन पहले ही गर्भपात करवाया है इसलिए..."  "क्या?"  मैं हैरान रह गई। "क्या तुम्हें दुसरा बच्चा नहीं चाहिए?"  "नहीं, ऐसी बात नहीं है, लेकिन अमित भैया (देवर) की शादी पक्की हो गई है। शादी दो महिने बाद है। मम्मी जी का कहना है, "घर की बहू यदि गर्भवती रहेगी तो शादी के काम कौन करेगा? शादी तो जींदगी में सिर्फ एक बार होती है लेकिन बच्चें तो बाद में भी पैदा किए जा सकते है, इसलिए...!!" "क्या तुम्हारें पति ने भी विरोध नहीं किया?" "वे माँ के सामने कूछ नहीं बोलते है।" मुझे समझ में नहीं आ रहा था कि मैं क्या प्रतिक्रिया दूं? मैं सोचने लगी कि क्या हो गया है सरला चाची की सोच को? अच्छी पढी-लिखी है। घर के सभी लोग पढे-लिखें है। फिर सभी ने कैसे गर्भपात के लिए हां कर दी? बच्चा माँ के गर्भ के अंदर होने पर भी उसमें एक आत्मा तो होती ही है न। फिर हम उसे हत्या क्यों नहीं मानते? जितना पाप एक जीवित व्यक्ति की हत्या पर होता है उससे कहीं अधिक पाप भ्रुण-हत्या पर होगा क्योंकि उस भ्रुण ने तो अभी इस दुनिया में कदम भी नहीं रखा है। वो यह दुनिया देखें-समझे इसके पहले ही निर्दयी लोग उसे मारना चाहते है! सरला चाची तो बहुत ही धार्मिक है। जब देखों तब भागवत, रामायण, सुंदरकांड, मंगल पाठ सभी जगह जाती रहती है। फिर वो एक जीव-हत्या करने (और वो भी सिर्फ काम की वजह से) कैसे तैयार हो गई? पहले बच्चा नहीं हुआ तो बहू को कोसा गया, जब एक बार बच्चा हो गया तो बहू को बच्चा पैदा करने की मशीन समझा जाने लगा! जब चाहे तब उत्पादन कर लो! मशिन को कोई भावनाएं थोडी ही होती है!!!


घटना 2-

नेहा ने दुसरी बार गर्भपात करवाया क्योंकि उसे पहले से दो बच्चे थे और उन्हें तिसरा बच्चा नहीं चाहिए था। परिवार नियोजन के इतने साधन होने के बावजुद, उसके पति को कोई भी साधन जंच नहीं रहा था। नेहा के परिवारवालों ने, नेहा की परिवार नियोजन वाली शल्यक्रिया इसलिए नहीं करवाई थी कि जब भी गांव में सरकारी शिबीर आयोजित होंगे तब शल्यक्रिया करवायेंगे ताकी बहुत ही कम रुपयों में शल्यक्रिया हो सके। और ऐसे शिबीर गांव में आने से पहले ही उसे गर्भ रह जाता!! उसके पति को किसी ने बता दिया था कि पुरुष नसबंदी करने से पुरुषत्व में कमी आती है इसलिए उसके पति ने नसबंदी नहीं करवाई। परिणामत: नेहा को दुसरी बार गर्भपात करवाना पड रहा था। असल में लोग छोटी-छोटी बिमारी के लिए भी (जिनका इलाज घर में भी संभव है) डॉक्टर के पास जाते है। लेकिन वास्तव में जिन बातों के लिए डॉक्टरी सलाह की जरुरत होती है, वे बातें अपने यार-दोस्तों को पुछ्ते फिरते है!! आखिर हम लोग गर्भपात को इतना सहज क्यों लेते है? गर्भपात न होकर जैसे कोई खेल हो गया! हम अपने ही अंश की हत्या इतनी आसानी से कैसे करते है?


खुशी और नेहा ये सिर्फ दो उदाहरण नहीं है। ऐसी कई खुशी और नेहा, हमारे आस-पास आज भी मौजूद है जो अपनी ममता का गला घोंटने मजबूर है। आखिर हम कब समझेंगे कि भ्रुण भी हमारी तरह ही सांस लेता है, इसलिए वह भी एक जीव ही है। अत: भ्रुण-हत्या भी एक जीव-हत्या है!!

गर्भपात से नारी का शरीर कमजोर होता है, वो अलग!एक अध्ययन के मुताबिक, हर साल देश में 67 लाख गर्भपात होते है और लगभग 20000 महिलाओं की गर्भपात संबंधी जटिलताओं के कारण मृत्यू हो जाती है!!

अमेरिका में कूछ साल पहले एक डॉक्टर ने एक विडिओ फिल्म बनाई थी। जिसमें यह बताया गया था कि जब माँ-बाप बच्चे का गर्भपात करने की सिर्फ सोचते भर है, तभी से भ्रुण पर क्या असर होता है। माँ के गर्भ में भी वह नन्हीं सी जान कितनी डरती है। माँ का गर्भ, दुनिया की सबसे सुरक्षित जगह! लेकिन वहां पर भी वो नन्हीं सी जान डर से कंपकंपाती है! उसके मस्तिक से जो डर वाली तरंगे निकलती है, वो देख कर पत्थर भी पिघलने लगे! और जब डॉक्टर गर्भपात करते है तब वो भ्रुण के कैसे टूकडे-टूकडे कर उसे बाहर निकालते है, इसका उन्होंने वीडिओ बनाया। वो दिल दहलाने वाला विडिओ यदि हम देख ले तो मैं विश्वास से कहती हूं कि हम सपने में भी भ्रुण-हत्या करने की ना सोचे!!

Saturday, 7 January 2017

महिलाओं के अधिकार, वह अधिकार है जो प्रत्येक महिला या बालिका का विश्वव्यापी समाजों में पहचाना हुआ जन्मसिद्ध अधिकार या हक है। १९वीं सदी में महिला हक संग्राम और २०वीं सदी में फेमिनिस्ट आंदोलन का यह आधार रहा है। कई देशों में यह हक कानूनी तौर पर, अंदरूनी समाज द्वारा या लोगों के व्यवहार में लागू होता है तो कई देशों में यह प्रचलित नहीं है। कई देशों में व्यापक तौर पर मानवाधिकार का दावा निहित इतिहासिक और परम्परागत झुकाव के नाम पर महिलाओं और बालिकाओ का हक पुरुषों और बालकों के पक्ष में दे दिया जाता है। महिलाओं के अधिकार के विषय मे कुछ हक अखंडता और स्वायत्तता शारीरिक करने की आजादी, यौन हिंसा से मुक्ति; मत देने की आजादी; सार्वजनिक पद धारण करने की आजादी; कानूनी कारोबार में प्रवेश करने की आजादी;पारिवारिक कानून में बराबर हक; काम करने की आजादी और समान वेतन की प्राप्ति; प्रजनन अधिकारों की स्वतंत्रता; शिक्षा प्राप्ति का अधिकार।

स्त्री भ्रूणहत्या

                 स्त्री भ्रूणहत्या  ( वरदाची कविता)
थांबा! या जगात जन्म घेण्याआधीच मला का मारून टाकताय?
मी एक मुलगी आहे म्हणून? 
आज कित्येक नवजात मुलींचा हाच मूक आक्रोश आहे!
जगातील कित्येक सुंदर गोष्टी पाहण्यापासून, अनुभवण्यापासून आम्हांला का वंचित ठेवताय?

मी तुमचाच एक अंश, तुम्हीच प्राण ओतलेत, तुम्हीच माझ्या शरीरात रक्त पोहचवलंत...... 
आणि आज.. तुमच्याच अंशाला, तुमच्याच प्राणाला, तुमच्याच रक्ताला, तुम्ही मारताय? 
का? मी एक मुलगी आहे म्हणून?

मुलगा म्हणजे वारस, वंशाचा दिवा... आणि मुलगी?
मुलगी म्हणजे परक्याचं धन? इतरांना अभिमानानं सांगता... पहिली बेटी, धनाची पेटी!
आणि तुमच्याच धनाच्या पेटीला तुम्ही दूर सारताय? का? 
धनाची पेटी एक मुलगी आहे म्हणून?

मुलगा तुमची वंशवेल वाढवतो, आणि मुलगी तिची स्वत:ची बीजं निर्माण करते.....
तुम्ही एका स्त्रीच्याच पोटी जन्मलात, मग मुलगाच हवा असा अट्टहास का?
तुम्ही मुलगी मारताय, म्हणजे एक भावी मातृत्वच गमावताय.
तुमचेच प्राण, तुमचाच अंश, तुमचंच रक्त, तुमचीच धनाची आणि आनंदाची पेटी म्हणजे मी!! मुलगी!
तेव्हा...... इतरांना मुलगी झाली तर म्हणा, अभिनंदन मुलगी आहे! 
आणि मीही तुम्हांला सांगतेय, मुबारक हो! मुलगी झालीय !

Wednesday, 14 December 2016

'स्त्री भृण हत्या'

'स्त्री भृण हत्या'
स्री भृण हत्या व आपली जबाबदारी
स्री भृण हत्या हा आपल्या देशाला लागलेला सामाजिक कलंक आहे . त्याचा सामना कसा करायचा हे एक फार मोठे आव्हान सरकार ,सामाजिक संस्था आणि प्रत्येक सुजान नागरीकापुढे आहे. भारतात स्री गर्भाच्या हत्येचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडाच्या (युएनपीएफ) ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
१९९९ मध्ये दर एक हजारी मुलांमागे मुलींचे प्रमाण ८१९ मुली असे झाले आहे. मुली वाचवण्यासाठी आता मोहीम सुरु करणे गरजेचे आहे. २०१० च्या जनगणनेनुसार अल्वर जिल्ह्यात प्रति एक हजार मुलांमागे मुलींची संख्या ८८८ होती. हेच प्रमाण राज्य पातळीवर ९०९ तर देश पातळीवर ९२७ आहे. परंतु महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात स्री गर्भाच्या हत्येचे प्रमाण लक्षणीय आहे. सरकारने गर्भ लिंग चाचणीला कायदेशीर बंदी घालूनही मानवतेचे हत्यारे असलेले अनेक वैद्यकीय व्यावसायिक आडमार्गाने लिंग चाचणीचे धंदे करीत आहेतच.
स्री गर्भाच्या हत्येचे प्रमाण रोखण्यासाठी एक क्रांतिकारी उपक्रम राबविला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून घेऊन आपापल्या पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. कधीही न पाहिलेल्या जगाचा निरोप घेण्याची दुर्दैवी वेळ स्री गर्भावर येऊ नये असे या प्रकल्पाचे स्वरूप असायला हवे. स्री गर्भाच्या हत्येसंदर्भात जनसामन्यांमध्ये अगदी प्राथमिक स्तरावर जागृती होणे आवश्यक आहे. त्याचे गांभीर्य लोकांना कळणे आवश्यक आहे. यासाठी बदल होणे गरजेचे आहे. स्री भृण हत्या रोखणे खरे तर हा उपक्रम देशात सर्वत्र राबवणे आवश्यक आहे. सर्व समाजाने यासाठी पुढाकार घेऊन याचा प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे आहे. स्री गर्भाचे रक्षण ही एक राष्ट्रीय जबाबदारी असून कोणताही धर्म, जात, पंथ यांची मर्यादा न बाळगता प्रत्येक भारतीयाने आपापल्या परीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्री भृण हत्या रोखावी यासाठी महिला बचत गट, सामुदायिक विवाह मंडळे आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी क्रांतिकारी विचार प्रसार करणे गरजेचे आहे. जी स्री आपल्याला जन्म देते, आपले पालन पोषण करते, शेवटच्या श्वासापर्यंत आपली सेवा करते त्या स्री जातीच्या अस्तित्वावरच स्री भृण हत्येमुळे संकट आले आहे.
स्री भृण हत्या या गंभीर आजाराने समाजाला पुरते ग्रासलेले आहे. गेल्या वर्षात राज्यात अंदाजे ४ लाख ६८ हजार ६८० मुलीना गर्भातच मारण्यात आल्याचे टिपाणामध्ये नमूद केले आहे. स्री हत्येची समस्या दिवसेदिवस उग्र स्वरूप धारण करत आहे. स्री पुरुष लिंग गुणोत्तर अतिशय असंतुलित झाले आहे. ही एक अतिशय गंभीर व चिंताजनक बाब आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नवनवीन संशोधन यामागे नेहमीच उदात्त हेतू असतो. सोनोग्राफी या तंत्रज्ञानाबद्दल घडलेले दिसते. शरीरात होणारे अनावश्यक बदल उग्र स्वरूप धारण करण्याआधी जर टिपता आले, तर त्यावर योग्य उपचार करता यावा किंवा गर्भामध्ये जर काही व्यंग असेल आणि चाचणीत ओळखून योग्य निर्णय घेता यावा या दृष्टीने सोनोग्राफी एक आशेचा किरण वाटला. मूळ मानव जातीच्या कल्याणासाठी विकसित तंत्रज्ञानाचा विपरीत परिणाम करण्यासाठी वापर झाल्यामुळे एका नवीनच समस्येचा उगम झाला आहे..... ती म्हणजे स्री भृण हत्या.

पुरुष हा कुटुंबाचा प्रमुख असतो. कर्ता-धर्ता असतो. त्यामुळे पुरुषाला कुटुंबात अनन्यसाधारण महत्त्व असते. हीच गोष्ट मुले लहानपनापासून पाहत असतात. म्हणून त्याच गोष्टी त्यांच्या मनामध्ये रुजतात. मुलांना लहानपणापासून विशेष वागणूक मिळते. महागडी खेळणी, पौष्टिक आहार, मैदानी खेळ, मान, सन्मान इ. तर मुलींना बंधनात वाढवले जाते. हे करू नकोस ते करू नकोस. घरकामात लक्ष घाल, मुलीना असच वागायला हवं, सगळीकडे मोजमापे लावली जातात. सतत तू मुलगी आहेस याची जाणीव करून दिली जाते. लग्न झाल्यावर मुलीला सासरी जाव लागत म्हणजेच ती परक्याच धन आहे. अर्थातच तिला किती शिकविले तरी त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही. असा चुकीचा ग्रह निर्माण झाला आहे. मुलीच्या लग्नाच्या वेळी द्यावा लागणारा हुंडा मुलगी किती ही शिकली तरी तिच्या योग्यतेचा वर शोधताना आई वडिलांची होणारी फरफट आणि हुंड्यासाठी करावी लागणारी तडजोड मुलींच्या नजरेतून सुटत नाही. मुलगी जन्मली की तिच लग्न होईपर्यंत याच व्यथेने पालक व्यस्त असतात. म्हणजेच स्री- भृण हत्येच्या पद्धतीला म्हणजेच समस्येला हुंडा पद्धती अप्रत्यक्षपणे हातभारच लावत असते.
आपल्या समाज व्यवस्थेतच ही संकल्पना ठाम रुजलेली आहे की मुलगा म्हातारपणी आपला सांभाळ करेल, मुलगी काय लग्न झाल की सासरी निघून जाईल .त्यामुळे जर मुलीकडे राहावे लागले तर पालकांना फार अपराध्यासारख वाटत आणि समाजातही त्यान मान मिळत नाही. मुलगी जन्मालाच न आलेली बरी असा एकांगी विचार करण्यास प्रवृत्त करते, आई वडिलांनी लहानपणापासूनच दोन अपत्यामध्ये भेदभाव करू नये, जेणेकरून मुलामध्ये हे विचार रुजणार नाही याची काळजी घ्यावी.मुलगा किवा मुलगी असो.दोघानाही समान वागणूक मिळायला पाहिजे. दोघानचीतुलना ही कधीच करू नये.
१) कायद्याची एक बाजू पहिली तर गर्भ धारणापूर्व आणि प्रसुतीपूर्व निदान कायदा १९९४ च्या कलम४ नियम ९ नुसार एक फाँर्म दाखल करणे डॉक्टरांना अनिवार्य आहे.
२) या कायद्यात २००३ मध्ये सुधारणा करण्यात आली सेक्शन ४ नुसार गर्भवती स्रीच्या चाचण्याचे पूर्ण रेकॉर्ड ठेवणे डॉक्टरांना बंधनकारक आहे. सेक्शन २३ नुसार कायद्यातील कोणत्याही तरतुदीचे उल्लघन केल्यास ३ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. सेक्शन १७-१९ नुसार अधिकाऱ्यांना गर्भलिंग निदान चाचण्याची शंका असणाऱ्या ठिकाणी शोध वॉरंट जारी करण्याचा अधिकार आहे. सेक्शन ३०-१२ नुसार सोनोग्राफी मशीनचा शोध घेणे, ताब्यात घेने सिल करणे इ.अधिकार आहेत.
कायदे अस्तित्वात असूनही हे गुन्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात घडत असतील तर त्यातून पळवाटा शोधल्या जात असाव्यात किवा व्हायला हवी त्या प्रमाणात त्याची अंमलबजावणी होत नसावी किवा ते डॉक्टरांवर जरब निर्माण करण्यास पुरेसे नसावेत.
आई मला जगायचंय ही आर्त हक कानावर पडताच आईचा जीव कासावीस झाला अन डोळे पाणावले . पण करणार काय? रुढी परंपरेने ग्रासलेल्या देशात तिच्या सारख्या अनेक कळ्या रोज खुडल्या जातात मग तिला जिवन मिळणे कुठे शक्य होते,”आईमालाहे सुंदर जग पहायचं बाबा व आजीचा सहवास अनुभवायचा हे ती सतत आईला गर्भात सांगत असे. मुलगा-मुलगीअस भेद करणे निरर्थक गोष्ट आहे. जेव्हा त्या कोवळ्या जीवाचा पिताच तिचा अंथ करतो. त्या वेळी हा समाज त्याला विरोध करत नाही ही गोष्ट मानला दुखावते .मुली सगळ्यावर अधिक प्रेम करतात. आई-वडीलानाही त्याच जीव लावतात. तरीही मुलगी नको, अशी भावना का असते ? अनेकाच्या मनात हाच विचार असतो , विचार बदलण्यासाठी आता युवा रस्त्यावर उतरला पाहिजे, स्रीयांना कमकुवत मानले जाते, याचीही या युवा पिढीत चीड आहे पालक इतके निष्ठुर कसे होतात? गर्भातच उमलणाऱ्या कळीला ते असे कसे खुडून् टाकू शकतात? त्या जीवालाही जगण्याची इच्छा नसेल ? आपण ही उमलावे, फुलावे असे वाटत नसेल? तो जीव तुमच्याशी बोलू शकत नाही, स्वतःला वाचवू शकत नाही म्हणून पालकाच त्याचा गैरफायदा घेणार ? पालक स्वतःला कसे माफ करू शकतात ?
आपण दररोज सकाळी उठल्याबरोबर वर्तमानपत्र पाहतो. पहिल्या पानावर स्रीयावर अन्याय,अत्याचार,बलात्कारच्या घटना, छळ करून मारणे , त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणे. अनेक मार्गाने स्रीयांचा छळच केला जातो असे का होते. या मागची करणे कोणती? स्रीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोणच बदलायला हवा. स्रीकडे एक उपभोग्य वस्तू म्हणून पहिले जाते.हेच बघा ना ताजे उदाहरण राजधानी सारख्या शहाराच्या ठिकाणी दिल्लीत चालत्या बसमध्ये एका २३ वर्षाच्या युवतीवर सामुहिक बलात्कार ही केवढी मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आशा अनेक घटना पाहतो, ऐकतो. स्रियांच्या अत्याचाराविषयी सांगावे तेवढे कमीच आहे. जी मानवजातीची निर्मिती करते तिलाच नष्ट करायला लागलेल्या राक्षसाला शिक्षा ही व्हायलाच हवी.
एक स्री किती महत्वाची भूमिका बजावते ती कुणाची तरी मुलगी असते...ती कुणाची तरी बहिण असते...ती कुणाची तरी पत्नी असते...ती कुणाची तरी आई असते...ती कुणाची तरी माय असते...ती कुणाची तरी आजी असते; ही सगळी नाती फक्त एक स्रीच जपू शकते. या प्रगत राष्ट्रामध्ये मग तिच्यावर का असा अन्याय, अत्याचार असा प्रश्न डोळ्यापुढे उभा राहतो मग तिच्या या प्रश्नांना कोणी वाचा फोडू शकत नाही का? नुसता कायदा करून उपयोग नाही जितका कायदा कडक तितक्या पळवाटा जास्त. जेव्हा लोकांच्या सहकार्यातून समंजस पणाने जेवढे प्रश्न मार्गी लागतील त्यातून स्री भृण हत्येला जीवदानाच मिळेल.
स्रियांच्या समस्या जाणून घेऊन योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. एका स्रीनेच एका स्रीला वाचवण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. आजच्या महिलांनीच लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशी भूमिका समाजातील सर्व जाती धर्मातील तळागाळातील समाज जेव्हा घेईल तेव्हाच खऱ्या अर्थाने स्री भृण हत्या थांबेल.
मुलगा वंशाचा दिवा आहे . त्याला मात्र तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचे मुलीला मात्र कमीपणाची वागणूक द्यायची आणि लवकरच तिचे लग्न करून द्यायचे. समाजातील ही विचारसरणीच बदलायला हवी, कल्पना करा स्री जर जन्मालाच आली नाही तर एक दिवस असा येईल की मनुष्य जातच ह्या भूतलावरची नष्ट होईल हे जग ओस पडेल स्रीलाही पुरुषाच्या बरोबरिने स्थान देऊन तिच्यावरील अन्याय अत्याचार थांबवायलाच हवा समाजाची मानसिकता बदलल्याशिवाय स्रीयांवरील अन्याय अत्याचार कमी होणार नाही. स्त्रियांविषयी घृणास्पद वागणूक जेव्हा समाजाच्या मनातून निघून जाईल तेव्हाच खऱ्या अर्थाने स्त्री मुक्तपणे स्वतंत्रपणे जगू शकेल व स्त्री भुण हत्येचे प्रमाण कमी होईल व मुलीच्या जन्माचे स्वागत केले जाईल तसेच स्त्रीभ्रूण हत्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. स्त्रीभ्रूण हत्येला हा समाज जबाबदार आहे. स्त्रीभ्रूण हत्या सामुहिक पुढाकाराने टाळता येऊ शकते पण आपल्या समाजाला अद्याप तेवढे भान आलेले नाही. आज सर्वत्र स्त्रियांवरील अत्याचाराचा भस्मासूर बोकाळला आहे. पण याला जबाबदार कोण? कधी कधी एक स्त्रीच एक स्त्रीचा गळा घोटते. स्त्रीच म्हणते मुलगी नको मुलगा हवाय तसेच अनेक ठिकाणी शहरामध्ये स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार यालाही काही अंशी स्त्रियाच जबाबदार आहे. स्त्रियांचे राहणीमान अत्यंत तोकडे कपडे वापरणे पाश्चात्य राहणी मानाचे अनुकरण करणे तसेच ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनीही स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्त्री-शिक्षणाची चळवळ सुरु केली. त्यांनीही स्त्रियांवरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला स्त्रीला कमी लेखण्याची परंपरा प्राचीन काळापासूनच होती. सती जाण्याची पद्धत ही पद्धत राजाराम मोहन रॉय यांनी मोडून काढली व तसा कायदा आमलात आणला आजही संरक्षणासाठी अशा कायद्याची गरज आहे.
विवाहाच्या कायद्यात बदल झाला असला तरी ही आज मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये कमी वयाच्या मुलींची लग्न केली जातात आणि मग कमी वयात तिच्यावर संसाराचा बोजा पडतो. हा घटक स्त्रीभ्रूण हत्येला कारणीभूत आहे. स्त्रीभ्रूण हत्या हा समाजाला लागलेला कलंक दूर करण्यासाठी खऱ्या अर्थाने सामाज प्रबोधनाची गरज आहे. विनाशाच्या खाईकडे चाललेला समाज भरकटलेले स्त्रीभ्रूण हत्येचे बीज याला आज वाचविण्याची गरज आहे. एक स्त्री वाचली तर एक कुटुंब वाचेल, एक घर वाचले तर एक वस्ती वाचेल, एक वस्ती वाचली तर एक खेडे वाचेल,ऐक खेडे वाचले तर एक तालुका वाचेल,ऐक तालुका वाचला तर एक जिल्हा वाचेल, एक जिल्हा वाचला तर एक राज्य वाचेल, एक राज्य वाचले तर एक देश वाचेल, एक देश वाचला तर संपूर्ण जग वाचेल, म्हणूनच मला असे वाटते स्त्रीभ्रूण हत्या थांबलीच पाहिजे.